प्रभु श्रीरामाचे अस्तित्व नाकारणे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुंचेच अस्तित्व नाकारण्यासारखे आहे. रामाचे अस्तित्व म्हणजे पुराणातिल वांगी आहेत असे प्रतिज्ञापत्र सादर करुन केंद्रातील भंगार कोंग्रेस सरकारने ८० कोटी हिंदुंच्या भावनान्वर बेदरकारपणे थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. आज कोंग्रेसवाल्यान्नी रामाचे अस्तित्व नाकारले, उद्या शिवरायांचे अस्तित्व नाकारले जाईल आणि काय सांगावे, हिंदु धर्मच अस्तित्वात नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करुन हे सरकार संपुर्ण हिंदुस्थान मुसलमानांच्या नावावर करुन टाकील. हिंदु बांधवानो, ज्या देशात तुम्ही जन्मलात व वाढलात तो देश म्हणजे केवळ जमिनीचा एक भुखंड नाही. या भुखंडाचा हिंदुस्थान बनविण्यासाठी लाखो ज्ञात, अज्ञात विरानि बलिदाने दिली. हा हिंदुस्थान हिंदुंच्या रक्तातुन निर्माण झाला. राम-क्रुष्णाच्या भक्तितुन आणि शिवरायांच्या शौर्यातुन निर्माण झाला.

         हिंदुस्थानच्या जिवनात रामाशिवाय दुसरे आहे तरी काय? सर्वत्र रामच आहे. आपण आपल्या आत्म्यालाही आत्माराम म्हणतो. परस्परान्ना अभिवादन करताना 'राम राम!' म्हणतो. एखाद्यात काहि दम नाहि, अर्थ नाहि त्या अर्थाने आपण म्हणतो, 'छे हो, त्याच्यात काहीच राम नाही!' माणुस मेला तर आपण म्हणतो, 'त्याने अखेरच राम म्हंटला.' स्मशानाची वाटचाल करतानाही म्हणतात, 'रामनाम सत्य है!' सध्याच्या जमान्यातील पक्षबदल, स्वार्थी माणसाची निंदा करतानाही आपण म्हणतो, 'आयाराम गयाराम!'. उत्तम औषधी इलाजाला आपण ' रामबाण ईलाज. ' म्हणुन मान्यता देतो. गांधीजी हे निधर्मी होते. पण तेही म्हणत कि 'आपल्याला आता रामराज्य आणायच आहे.' रामाच्या नावाने भुत पळतात. रामनामाने दगड तरतात. असा हा प्रभु श्रीराम खरोखरच जन्मला नाही काय?