मुकुंदराव,
वेगळ्या, पठडीबाहेरच्या वाटल्या तुमच्या कविता...ही कविता तर आवडलीच...पण `मी...अनंत`, आणि `पाऊस १` व `पाऊस २` याही कविता आवडल्या. `काल रात्री` ही कविता वाचून तर मला कविश्रेष्ठ लोककवी मनमोहन नातू यांची आठवण झाली. `माझ्या सदऱ्याला चंद्र-सूर्याची बटणे`, अशी काहीशी कल्पना त्यांनी एका कवितेतून मांडली आहे. उत्तुंग कल्पनाविलास, हा त्यांचा विशेष. तुमच्याही या कवितेत मला तो जाणवला. शुभेच्छा !