अशा प्रकारच्या लिखाणाला प्रतिसाद फार कमी येतात. दोन कारणे. एक तर खरोखर मनापासून वाचणारे सगळे लेखन पूर्ण झाले की नंतर प्रतिसाद टाकू असे म्हणून गप्प बसतात. दुसरे असे की गौरी-गणपती असे ज्वलंत विषय असताना इथे जी. ए. कोण वाचणार?
याने निराश न होता आपण लिखाण चालूच ठेवावे. यात प्रबोधनापेक्षा स्वानंदाचाच भाग अधिक असतो हे मी सांगायला नको...