मंडळी,

विंदा म्हणजे केशवसुत आणि कुसुमाग्रज नाहीत इतके सामान्य ज्ञान आहे हो मला.   वर एका प्रतिसादीने कुसुमाग्रज लिहिले आणि दुसऱ्याने केशवसुत. ही कविता विंदांची आहे असे मी वाचले होते. म्हणून त्यांना विचारले की विंदा कोण? त्यापुढच्या विंकिंग स्मायलीचा अर्थ जर कोणाला कळत नसेल तर प्रश्न हलकेच घ्या स्वरूपाचा आहे हे सांगण्यासाठी तेथे ती येते, याचेही कोणाकडे वेगळे स्पष्टीकरण असल्यास व्य. नि. तून कळवावे.  

ही कविता म.टा.मध्ये विंदांना ज्ञानपीठ मिळाला तेव्हा त्यांच्या काव्यांशाची ओळख म्हणून दिली होती. आता गफलत म.टा. ची असेल तर तेच जाणोत बापडे!

आता विषयांतराबद्दल क्षमस्व म्हणून काही उपयोग आहे  असे वाटत नाही.