संकल्पना आवडली.

पण तपशीलात काही त्रूटी आहेत असे वाटले. म्हणजे ही कथा मोठ्या माणसाने आपल्या आठवणी सांगाव्यात अशी वाटत नाही. कारण बऱ्याच वेळा निवेदन बाळबोध (म्हणजे वाईट नव्हे. "विचार" लहान मुलांच्या विचारांप्रमाणे) वाटले आणि लहान मुलाचे निर्व्याज कथनही वाटत नाही, कारण वापरलेली "भाषा" ही मोठ्या माणसाची वाटते. शिवाय ते पेन अजूनही त्या मुलाकडे आहे, म्हणजे ही भूतकाळातली गोष्ट आहे. त्यामुळे वाचताना थोडा गोंधळ उडाला.

तसेच जयूला झालेला कोड, समस्त दुनियेला दिसत होता तर ह्या मुलाला का दिसला नाही. आणि जर दिसण्याजोगा नसेल तर अशा गोष्टी सहसा बाहेर फोडल्या जात नसाव्यात असे वाटले.

अर्थात ह्या काही त्रुटी वाटत असल्या तरी एकंदरीत तपशील आणि बारकावे छान दाखवले आहेत आवडले.

- कोहम