गुरु,
माणसे.. चे सगळे भाग वाचून काढले. सन्जोपराव म्हणतात त्यात थोडे तथ्य आहे खरे. पण मला वाटाणारे कारण जरा वेगळे आहे. एरवी मनोगती स्वप्रतिभेने जे लिहितात त्यावर लगोलग मिळतणारी दाद ही उत्स्फूर्त वाहवा असते. त्यात लेखकाच्या प्रयत्नाला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न असतो. पण एखाद्या गानपंडिताने पेश केलेला ख्याल एकून द्यावयाची दाद तितकीच विचारपूर्वक अणि ताकदीने द्यावी लागते. अन्यथा केवळ स्तिमित होऊन राहणे एवढेच हाती उरते. जी.ए. चे लेखन दरवेळी एक अनवट राग प्रसवते. त्या कल्लोळात आधी हरवूनच जायला होते. तिथे शब्द कुठले सुचायला?
मात्र आपण सोडलेला संकल्प तडीस नेत आहात. त्यास अनेक शुभेच्छा.
धन्यवाद.
अरुण वडुलेकर