भार्गवराम,
काव्यक्षेत्रात भरकटलेली चर्चा पुन्हा मूळपदावर आणल्याबद्दल धन्यवाद!
एकूणच आस्था चिरडून धंदा करायचा हा प्रकार आहे, तो आस्था वापरून केलेल्या धंद्यापेक्षा वेगळा नाही.
हे विधान पूर्णपणे पटले. या प्रकल्पाचा नफा-खर्चाचा लेखा-जोखा (कॉस्ट बेनिफिट ऍनॅलिसिस) मांडून आणि लोकभावनेचीही योग्य ती कदर राखून (म्हणजे त्या भावनेचे राजकारण करणाऱ्यांची नव्हे) आढावा घेऊन मगच निर्णय घ्यावा असे वाटते.