कथा सुंदर जमली आहे. लहान मुलाने जयूताईला इंग्रजी शिकवणे हेही मजेशीर.
'निळ्या काचेचे पेन' हे शीर्षक मात्र जास्त कळले नाही. हे पेन शेवटच्या दोन ओळींतच कथेत येअत असताना त्याला कथेचे शीर्षक बनवण्याइतके महत्त्व का आले हे कळले नाही. काही प्रतिक असल्यास मला नीट समजले नाही.
(कोड आलेल्या जयूताईने स्वतःच्या हाताने दिल्यामुळे 'पेन मळके आहे, आईकडून धुवून घ्या' असे सांगितले हे समजू शकते, पण पेन थेट मुलाच्या हातातच दिले ना? मग त्याने हात लावल्यानंतर धुवून काय उपयोग? शिवाय कोड संसर्गजन्य नाही, हल्ली त्यावर उपचारही आहेत असे असून महारोग्याप्रमाणे जयूताईला आश्रमात का पाठवले हे लॉजिक कळले नाही. तत्कालिन समजूतींमुळे, उदा. 'मागच्या जन्मीच्या पापाचे फळ म्हणून कोड येते' इ.इ यामुळे तिला आश्रमात पाठवले असावे का?)
मला माहिती आहे, या प्रश्नांची उत्तरे बाकी वाचकांकडे नक्कीच असतील, मीच कथा नीट वाचली नसेल.