नमस्कार !
"माहितीचा अधिकार : जनतेला प्राप्त झालेले अत्यंत प्रभावी शस्त्र" असं खुद्द अण्णा हजारे यांनी मे २००७ च्या "लोकराज्य" या "माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन" तर्फे प्रसिद्ध होणार्या मासिका मधल्या मुलाखती मद्धे नमूद केले आहे...हा मे महिन्याचा लोकराज्य चा अंक आत्ता माझ्या हातात असुन या अंकात माहितीच्या अधेकाराविषयी समग्र माहिती देणारा विशेष विभाग आहे...
संपादिका मनीषा म्हैसकर [भा.प्र. से. ] म्हणतात," लोकराज्य मधिल लेखांचे पुन:मुद्रण केल्यास आम्हाला आनंदच वाटेल...!" कित्ती हा चांगुलपणा !!
म्हणुन मी काही माहिती येथे देतो...
[लोकराज्य हे शासनाचे मासिक असून, याची वार्षीक वर्गणी -मनी ऑड्रर्ने, `सहाय्यक संचालक(प्रकाशने),माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,बॅरेक नं १९,फ्री प्रेस जर्नल मार्ग ,मुंबई ४०००२१' या नावाने पाठवावी. मुल्य ५, वार्शिक वर्गणी ५०, संपर्क ०२२-२२८८२८८८]...(हा काही जाहिरातीचा प्रयत्न नसून शासनाचे प्रयत्न आपणा सर्वांपर्यंत पोहोचावेत एवढाच प्रामाणिक हेतु आहे....मी स्वतः देखील काही शासकीय नोकरीत नाही ! मी लोकशाही विषयी जागरुक असा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे )
तर,, आता मे २००७ च्या लोकराज्य मधील माहिती लिहिण्यास सुरुवात करतो....
"राज्य शासनाने हा (म्हणजेच, पक्षी:माहितीचा)अधिनियम मराठीत छापुन राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. तसेच फी चे दर,, ती कशी भरता येइल,शुल्काचे दर इत्यादी बाबतचे नियमही राजपत्रात प्रसिद्ध केलेले आहेत. तसेच ही माहीती राज्य शासनाच्या संगणकीय संकेतस्थळी (http://www.maharashtra.gov.in/) येथे उपलब्ध आहे.
....
मा̱. गीरगावकर,, आपणास अजुनही अर्जाचे टेंप्लेट हवे असल्यास मला कळवावे...ते देखील या अंकात दिले आहे. मी ते आपणा सर्वांसाठी इथे लिहु शकतो...
तरी मी आशा करतो वरील माहिती आपल्या उपयोगी पडेल... चला सर्व जण मिळुन हाती आलेल्या माहितीच्या अधिकार रुपी शस्त्राचा वापर करुन, भ्रश्टाचार रुपी राक्षसाचा नायनाट करू!
कळावे.
आपला
आदित्य.