शैशवातील मृदू जाणिवा आणि भावनांना प्रभावीपणे प्रकट करण्याचे आगळे सामर्थ्य लेखकात आहे.
कथानक १९५०-६० सालात घडणारे असावे असे वाटले. त्याकाळचे कोकणातले वातावरण मात्र फारसे उतरले नाही.
कोकण म्हटले की परसातली मोठी बाग, गडगडे बसवलेली विहीर, मोठमोठ्या झावळ्या असलेले माड-सुपारी, लेकुरवाळे फणस, वाळलेल्या झावळ्या जाळून पाणी तापवण्यासाठी तीन दगडांवर ठेवलेला (तांब्याचा) मोठा आणि काळाकभिन्न हंडा,
विहिरी शेजारी उघड्यावर शेंडी-जानवे चोळत, हर - हर गर्जना करत पाणी ओतून घेणारे पुरुष, आमराया, उन्हाळ्यात माळ्वदावर घातलेली आंब्यांची आढी अशी प्रत्यक्ष पाहिलेली अनेक दृष्ये डोळ्यासमोर तरळतात. कोकणात घडणारी कथा, पण यांचा उल्लेख नसणे हे खटकणारे वाटले.
शिवाय कोकणात उसाचे कर्वे, तळ्याकाठचा वड? असेलही तसे... पण त्याऐवजी फणसाचे गरे, खाडीजवळची आमराई असे जास्त शोभले असते. पण बंबावर वाळत घातलेली चड्डी, घामोळ्यावर आमसुलाचे पाणी खासच!
तसेच नायकाने प्रत्यक्ष कोड पाहणे आणि त्याच्या मनातील विचारतरंग आणखी स्पष्ट केले असते तर..? असे वाटले.
कथा थोडी लांबली असती तरी चालले असते.
एकूण कथा आवडली. लेखकाचे मन:पूर्वक अभिनंदन.