अशा चर्चा करणारे आणि त्या चर्चांना खत पाणी घालणारे भिंतीला तुंबड्या लावण्याचा प्रकार करताहेत असं वाटतं. रामसेतू होता, किंवा आहे तो मुळात कशासाठी होता, त्याचा तत्कालीन संदर्भ काय, आजच्या संदर्भात त्याला कितपत महत्त्व आहे, तो (समजा रामाने बांधला असेल असं धरून चाललं तर) जर नवीन काळाच्या गरजेनुसार पाडला आणि त्यातून काही चांगलं निष्पन्न होणार असेल, तर काय हरकत आहे? हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्रगत, समावेशक असा मानला जातो ना मग कशाला वाद तो सेतू रामाने बांधला कि नाही ह्यावर?
असे सेतू बांधण्या पाडण्याने हिंदू धर्म टिकला/ बुडला असा अर्थ काढायचाय का? मूर्ख सरकारच्या मूर्ख वर्तनावर टीका करून त्या मूर्खपणाला खतपाणी घालण्याचं काम कशाला करता? मनात राम असला की झालं. संजोपरावांनी लिहीलेल्या ओळी समर्पक आहेत. उगाच धर्म बुडव्यांचे सरकार म्हणून काँग्रेसच्या नावाने शंख कशाला करता? त्यापेक्षा स्वतः जबाबदार बना - आपल्या पोराबाळांना जबाबदार बनवा. बोंबाबोंब करून काही हातात लागणार नाही... तेव्हा, रामसेतू सोडून, रामकार्यासारखं सकारात्मक काही करता येतंय का पहा जरा...