शैशवातील मृदू जाणिवा आणि भावनांना प्रभावीपणे प्रकट करण्याचे आगळे सामर्थ्य लेखकात आहे.
अगदी हेच लिहिणार होतो. जयूताईबद्दल निखिलला असलेले आकर्षण फार संवेदनशीलरीत्या टिपले आहे. कथा अतिशय अतिशय सुरेख झाली आहे. फार फार फार आवडली. लांबली असती तरी चालले असते ह्या बाबत सहमत आहे.  इथल्या दोन पानांत माझ्या मते आमरायांना वगैरे फारसा वाव नव्हता, असे मला वाटते.