प्रशासक,

आपण केलेली ही सुधारणा अगदीच अप्रतिम आहे. यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले असतील यात काही वादच नाही. मनोगती आणि सगळेच मराठी लेखक वाचक आपले शतशः ऋणी राहतील.

ही अशी सोय इतरत्र कोठेही माझ्या पाहण्यात आली नाहीये. हे जर पहिल्यांदा मनोगतावर होत असेल तर ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी श्रमणार्‍या प्रशासकांचे खरंच मनःपूर्वक अभिनंदन.

एक सूचना: शुद्धिचिकित्सकाची खिडकी थोडी मोठी आहे. त्यामुळे 'झाले' ची कळ जरा जास्त खाली जातेय.

(आनंदी मनोगती) ॐ