कथा मस्त जमली आहे. सद्गदित करते. माणसात वैगुण्य निर्माण झाले म्हणून त्याला टाकून न देण्याची शिकवणूक (मलकापूरची आजी) आणि मग जयूताईवरच तो प्रसंग ओढवणे हा विरोधाभास उत्तमरीत्या येतो. कथेचा कालखंड थोडा न समजणारा वाटला तरी फार बिघडले नाही. सुरुवातीचे प्रसंग भरपूर रंगवले आहेत, पण भाग २ मध्ये कथा एकदम वेग घेते हा बदल सावकाश झाला तर आणखी बरे.