इथे महाराष्ट्रात दर एक माणसाआड एकजण लेखक आहे, आणि तो त्या उरलेल्याला आपला वाचक वा श्रोता करायला उत्सूक आहे हो श श शाहरूखबंधू. त्यामुळे इथे प्रतिभावान (बघा कसे झाडावर चढले!) वैगरे लेखक भरपूर आढळतील. पुन्हा तुमचे मासिक पडले प्रसिद्ध ! मग तर काय हर्षवायूचा स्फोटच. त्यामुळे इथे 'किती देणार?' वैगरे प्रश्न कुणी विचारणार नाही (शीः काहीतरीच काय, निव्वळ बाजारातल्यासारखं वाटतं !)

तेंव्हा मासिकाचं नाव नाही तर किमान मानधन किती देणार, प्रताधिकाराचं (कॉपीराईटचं) काय, वैगरे तरी माहिती या मराठी प्रतिभावंतांना, त्यांनी न विचारता, द्याल? प्रसिद्ध मासिकाबाबतची ही माहिती तरी अप्रसिद्ध ठेवायचं काही कारण नाही.

तिकडे इंग्लंड अमेरिकेत तरी हे सगळं आधी पद्धतशीर ठरत म्हणे. म्हणून तिथले लेखक (आणि त्यांचे एजंट) सरस्वतीसोबत लक्ष्मीलाही नांदवून असतात. नुसतं हो हो हो नसतं बुवा तिथे. प्रतिभेचीही किंमत ठेवून घेता आणि ठेवता यावी लागते. (थांबतो. आता कदाचित सगळे, किंवा काही प्रतिभावंत तरी या लेखनावरच तुटून पडतील पहा. तसे नाही पडले तरच आनंद आहे म्हणा !)