वर्तमानपत्र हे उत्पादन आहे. माहिती (इन्फर्मेशन आणि नॉलेज) पुरविणे हे त्याचे काम आहे. ती रंजक पद्धतीने पुरविणे ही त्या उत्पादनाच्या स्पर्धेतून तयार झालेली गरज आहे. भाषेची बूज राखणे हे वर्तमानपत्राचे काम नाही. इतर भाषांतूनही हे हिंदीचे (आणि हिंदीवर इंग्रजीचे) कथित आक्रमण सुरु आहे असते आणि राहील (पहा -याच चर्चेतील इंदूरच्या एका प्रतिसादींचा प्रतिसाद)

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबीलिटीसारखे शब्द वापरून, परदेशीराहिल्याचा हवाला देऊन आपले मत सिद्ध होत नसते. वृत्तपत्रे भूकंपपिडीतांना, सुनामीग्रस्तांना मदत करून, आर्थिक विवंचनेतील अनेकांना मदतरूपाने प्रगतीची संधी देऊन ती जबाबदारी पार पाडित आहेतच

एक मुलभूत प्रश्न ः ज्या मराठी भाषेची बूज वैगरे राखण्याबाबत बोलतो आहोत, ती भाषा तरी कुठे ओरिजीनल आहे? तेलुगू, कन्नड, हिंदी, गुजरी- मालगुजरी, पाली अर्धमागधी,फारसी आणि इंग्लिश अशा अनेकविध भाषांचे ते कडबोळेच राहिले आहे. आता कडबोळ्याची बूज कशी राखणार ?

भाषेची बूज राखण्यातून वर आणि ती न राखण्यातून खाली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण असे खाली-वर नसतेच मुळी.