हहपु. पुलंच्या मूळ लेखाला साजेसा लेख आहे. अनेक आवडलेली वाक्यं उद्धृत करायचा मोह होतोय, पण हे बेष्ट. अलीकडेच बंद झालेल्या लेट अस भंकस ब्लॉगची आठवण करुन देणारे.
लगेचच भारतच्याच ओळीत बसलेला कुमार उठला, आणि ही इंदिरेने कसे मुरारजीला उपमॉनिटर केले होते आणि त्याही आधी जवाहरने कसे वल्लभला उपमॉनिटर केले होते याचे त्याने चिरक्या आवाजात सविस्तर विवेचन केले. शेवटी 'नेहरू घराण्याचे कर्तृत्त्वच एवढे आहे की अनेक जणांना विस्मृतीचा विकार जडतो. सोनियाच्या त्यागाने हे आजचे दिवस दिसत आहेत' अशी पुस्ती जोडली.
खपात आपण अग्रेसर असलो तरी असे पटकन उठून बोलणारा आपल्याकडे कुणी का नाही याबद्दल राजेंद्रने आपल्या लोकांना झापायला सुरुवात केली.'