धन्यवाद प्रियाली,

सुंदर लेझीम नृत्याचा दुवा दिल्याबद्दल.

आम्ही शाळेत असताना लेझीमच्या मुलींच्या शाळांमध्ये (हुजुरपागा, रेणुका, अहिल्यादेवी) स्पर्धा व्हायच्या, रमणबागेच्या मोठ्या मैदानावर, आणि शेकडो लेझीमच्या तालावर सगळेजण विद्यार्थिनी, शिक्षकही धुंद व्हायचे. 

पूर्वी पुण्यात गणपती मिरवणुकीत लेझीमची पथकं असायची, बहुदा मंडई, दगडुशेट गणपतीपुढे, सध्याचे माहिती नाही.