स्वाती,

घावन घाटले माझ्या खूप आवडीचे आहे. तू दिलेली घाटल्याची पद्धत पण छान आहे. माझ्या आईची पद्धत थोडी वेगळी आहे. ताजा नारळ खवून त्यात थोडे थोडे पाणी घालून नारळाचा खव पिळून घ्यायचा. त्याला नारळाचे दूध म्हणतात. या नारळाच्या पांढऱ्या स्वच्छ व दाट दूधात मग गूळ व वेलची घालून तांदुळाच्या घावनाबरोबर खायचे. यासोबत बटाटे उकडुन केलेली भाजी व ओल्या नारळाची चटणी, आणि बाहेर रिमझिम पाउस पडत आहे. आणि या गौरीच्या जेवणासाठी माहेरवाशीण बोलवली असेल तर अजूनच बहार! आणि मला कोकणस्थांकडे असलेल्या खड्याच्या गौरीपण खूप आवडतात.

इथे घावन घाटल्याची पाककृती दिल्याबद्दल छान वाटले स्वाती.

रोहिणी