मनोगतवर नवीन आहे त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला दुवा तयार करता आला नाही.
वाईट वाटलं तुमचा अनुभव वाचून.मी ३ वर्षांपासून अमेरिकेत आहे पण असे जुने गिफ्ट्स नेणारे लोक कधी दिसले नाही. सुदैवचं म्हटलं पाहिजे. मी अजून इंडिया गेलेली नाही पण जाताना नवीनच काहीतरी नेईल हे नक्की. पण मलाही विनम्रसारखा अनुभव येणार यात शंका नाही.माझ्या एका नातेवाईकासाठी कितीही गिफ्ट्स नेले तरी त्यांना समाधान नसतं. त्यांना वाटतं आम्ही इथे बसून भरपूर पैसा कमवत आहोत. त्यामागे आम्हाला होत असलेला त्रास त्यांना दिसत नाही. मुद्दा हा की,काहीवेळा कितीही चांगल्या वस्तू नेल्या तरी पदरी नाराजीचं येते.