अलीकडेचं मला भारतातल्या पेढ्यांची फार आठवण झाली.इथेही मिळतात पण फक्त मलईवाले. भारतात मंदिराबाहेर अगदी साधे,एकदम स्वस्त,एकदम साखरेसारखे गोड गोड  जे पेढे मिळतात त्याची मजा काही औरचं असते. शिवाय गंगाखेडच्या पेठ्यासारखे स्पेशल पेढे इथे कुठून मिळणार? मला तर वाटते परदेशात आपण 'मिस' जास्त करतो,मिळवतो कमी.