माझी मुक्ताफ़ळे...

धान्याचे पीठ करणारे यंत्र दिले असतेस तर ,
दिले तुजला पिठाचे यंत्र, किंमत कष्टाची तुला कळेल का?
भरले तुझे ताट आता, घास पानीचा भुकेल्याला देशील का?

म्लेंच्छांच्या राजवटीचा नाश केला असतास तर -
स्वजन रक्षणाच्या कर्तव्याची जाणीव तुला होईल का?
म्लेंच्छांपेक्षा गुलामीचाच नाश करू हा विचार तू करशील का?

गोरोबा कुंभारांना स्वयंचलित मिक्सर दिला असतास तर,
केले संत गोरोबाला आता जादुगार पॉटर , नतमस्तक त्यास तू होशील का?

सावतामाळ्याला स्वयंचलित शेतीअवजारे दिली असतीस तर,
नवीन शोधाची संधी आणि बुद्धिचे वरदान तुझे विसरशील का?

लोकांचे अज्ञान दूर करून,षड्रिपू निर्दाळले असतेस तर,
संतांच्या संदेशाचा मतीतार्थ जाणून अज्ञान तुझे तूच जाळशील का?
दुःख तुझे संपवेन ही, पण स्वताःची शक्ती तू जाणशील का?

आम्ही ही केली असती तुझी मुक्तता,
अठ्ठावीस युगांच्या ''वीटेवरी उभा राहा'' आदेशातून !


कर कटेवरी, उभी विटेवरी ठेवलीस मुर्ती माझी
आदेश देणाऱ्या पुंडलिकाच्या कर्तव्य प्रेमाची उंची तू गाठशील का?
माझ्या मुक्ततेचे सोड, समाजाच्या विषमतेतुन तुला तरी मुक्त करशील का?

वरदानाची अपेक्षा ठेव...
पण कठोर तपाचीही तयारी तू ठेवशील का?
श्रद्धा शक्तीचे एक रुप आहे, आणि तू ही देवाचाच अंश आहे,
सख्या जग बदलायची शक्ती तुझ्यातच आहे, आत तरी हे जाणशील का?

बंड्या म्हणे...