मिलिंद,

तुमचे काव्य खरोखरच फार प्रभावी आहे. ही कविता वाचून तुमच्या इतरही कविता वाचल्या आणि अभिव्यक्तीतली सकसता प्रकर्षाने लक्षात आली.

सत्याचा विखार आणि त्याला उत्तम प्रतिके व सामर्थ्यशाली शब्दांची जोड असे तुमच्या कवितांचे वैशिष्ट्य सांगता येईल.

आजपर्यंत केला नसल्यास तुम्ही आता तरी मौज वगैरे दर्जेदार अंकांसाठी तुमच्या कविता पाठवण्याचा जरूर विचार करा. शक्य झाल्यास तुमची काही माहिती निरोपाद्वारे मला पाठवा.

एक छोटी इच्छा सांगते. अधिक सकारात्मक, प्रेरणादायी, आनंदी विषय तुम्ही कसे हाताळता ते वाचायला आवडेल. इथे प्रकाशित करा ना अशा काही कविता.

तुम्हाला शुभेच्छा.

इथे आठवड्या, दोन आठवड्याने येऊ शकते. खरच छान लिहितात लोक इकडे.

मालती जोशी