मी अमेरीकेतलं हे मिस करते...

सर्वांना बहुतांशी मोफत किंवा माफक दरात उपलब्ध असलेली ठिकठिकाणची पब्लिक लायब्ररीची सुविधा, माझ्या युनिव्हर्सिटीची लायब्ररी, मी तेव्हा एकटी रहात होते त्यामुळे मला होतं ते स्वातंत्र्य..

तरी माझं काम, आवडत्या व्यक्तीबरोबर कायमचं असणं या महत्त्वाच्या गोष्टींपासून कधीही कुणाकडेही टपकणं, कामवाली बाई, इस्त्रीवाला, कुठलीही वस्तू 'रिपेर' करून मिळणे, मनात आलं की कुणावरही अवलंबून न रहाता कुठेही जाता येणे परवडण्याइतक्या पैशांत, पटकन उठून कोपऱ्यावर जाऊन भेळ, पाणिपुरी हादडता येणे असल्या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत सगळं जे आहे ते वरच्या गोष्टींपेक्षा खूप मोठं आहे. आणि हो लायब्ररी हा प्रकार मी इथेही मॅनेज करून घेतलाय.
स्वातंत्र्य मात्र विद्यार्थीदशेबरोबरच संपलं. कुठेही राह्यले असते तरी ते तसंच असतं म्हणा...