कलाकृतीत काही योग्य अयोग्य वाटले तर हा सांगतो तेव्हा कारटी का बिथरतात?  (४)

 कारटी का बिथरतात = टीकाकार = कलाकृतीत काही योग्य अयोग्य वाटले तर हा सांगतो

११

वयात आलेली लक्ष्मी हीच नवऱ्याची आई! (४)

लक्ष्मी = रमा -> वयात आलेली -> व-रमा-य = वरमाय = हीच नवऱ्याची आई

२१

मी लोकांमध्ये असताना मित्र येऊन चिकटले की भुईसपाट. (५)

मी लोकांमध्ये असताना -> ज-मी-न -> मित्र येऊन चिकटले -> जमीनदोस्त

३१

उधळले रान मध शोधण्याला ।
हाती तेव्हा आला दुष्ट फार!! (४)

उधळले रान मध = नराधम = दुष्ट फार

४१

मालकीचे नियंत्रण. (२)

ताबा

४३

मान्यता नाही असे हा दाखवतो तेव्हा कारण विचारणारा प्रश्न पुरुषात दडून बसतो.  (३)

कारण विचारणारा प्रश्न = का -> पुरुषात दडून बसतो -> न-का-र = मान्यता नाही असे हा दाखवतो



आवेग दाखवणारा कागद. (२)

ताव

देणारी नियम सोडून गेली तर निर्माण होणारा प्रश्न. (२)

देणारी = दा -> नियम = कायदा -> सोडून गेली -> कायदा  = काय = प्रश्न

कामावर जाण्यात मिळणारी सुट्टी. (२)

कामावर जाण्या -> रजा = सुट्टी

१२

उत्तरमीमांसेत गुरफटलेला पत्त्यांचा एक खेळ. (२)

उत्तरमीमांसे गुरफटलेला ->रमी = पत्त्यांचा एक खेळ

१३

ध नाही आणि मा सुद्धा नाही असे झाल्यावर गोंधळ झाल्यास  लिहिणाऱ्याला हे पैसे मिळतात. (४)

ध नाही आणि मा सुद्धा नाही = ध न मा न -> गोंधळ झाल्यास  -> मानधन = लिहिणाऱ्याला हे पैसे मिळतात

२१

जन्मणाऱ्यापुढे नमलेली प्रजा. (३)

जन्मणारा = ज, नमलेली = नता -> जनता = प्रजा

२५

मास्तरकीत अडकलेली जीवनाची पातळी. (२)

मास्तरकी अडकलेली -> स्तर = जीवनाची पातळी.

३२

कष्ट करा आणि सगळा डझन उलटवा. (२)

सगळा डझन = बारा -> उलटवा -> राबा = कष्ट करा

३४

केलेले उलटवणारे एक धान्य. (२)

केलेले = काम -> उलटवणारे -> मका = एक धान्य.