नवीन फॉण्ट मसूदा
नमस्कार,
आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुधारीत मराठी U1Gangal फॉण्ट-मसूदा आपल्यापुढे मांडत आहे. मित्रांनी सुचविलेले बदल '९४ चाव्यात मराठी' या संकल्पासाठी योग्य वाटले म्हणून स्विकारलेले आहेत. नवीन फॉण्ट आपण वापरून पहा ही विनंती. हा फॉण्ट केवळ विडोजच्या ऍप्लीकेशन्ससाठी बनविलेला आहे. सर्वांच्या विचारातून सुयोग्य प्रमाणीत-मराठी-संगणकासाठीची-टायपिंग व्यवस्था (कि-बोर्ड चे मॅपींग) आचरणात आणता येईल. की-बोर्ड लेआऊट सह इतर फ़ाईल्स देण्याची व्यवस्था केली आहे. यात पुढील बदल आणले आहेत, आणख़ी बदल हवे असल्यास सुचवावेत.
१) क आणि फ जोडाक्षरात अर्धे दिसतील अशी सोय केलेली आहे.
२) जोडाक्षरांची संख्या वाढवलेली आहे.
३) वरील गोष्टींना वाव देण्यासाठी गणिताच्या खुणा काढून टाकल्या आहेत.
४) फॉण्टच्या वळणाची स्टाईल बदललेली आहे.
५) फॉण्ट अधिक छोट्या आकारातला आहे.
६) बाकी मुलभूत उद्देश ९४ चाव्यात फॉण्ट बसवून तो विंडोज मधल्या सर्व ऍप्लिकेशन मधे विरूप-न-होता चालत आहे. आपणही तो तपासून पहावा.
कृपया आपले अभिप्राय पाठवावेत. मराठीच्या विकासात आपण असेच एकत्रितपणे काम करत राहू. आपल्या सुचना पुढील ईमेलवर पाठवाव्यात. gangals123@gmail.com
पुढील ठिकाणी U1Gangal फॉण्ट आणि माहिती मिळेल अशी सोय केली आहे.
Link: http://groups.google.co.in/group/gangals123?hl=en
आपला, शुभानन गांगल.
१९/२०, आयडिअल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहूस्कीम, मुंबई ४०००४९.
मोबाईलः ९८३३१०२७२७, टेलीफोनः ९१-२२-२६२०१४७३