असा दोष आमच्या एका जवळच्या नातेवाईकांमध्ये आहे. लहानपणी स्टॅमरिंग जाणवे. कालांतराने ते कमी झाले. सध्या ते ४० च्या आसपास असावेत. परदेशातील एका मोठ्या कंपनीत अति-उच्चपदावर आहेत. अद्यापही जवळच्यांना हा दोष अभावाने जाणवतो पण परक्यांच्या तो चटकन लक्षात येत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांना स्वतःला याबाबत अजिबात न्यूनगंड नाही.
असो.माझे मत याबद्दल बरेचसे वडुलेकरांनी सांगितले आहे तसेच आहे. संस्कृत श्लोकांबद्दल माहित नाही परंतु मोठ्याने, एक्स्प्रेश्न्ससहित पुस्तके वाचायला लावा. त्यामुळे एखादा शब्द जो अडखळतो तो कसा बोलावा किंवा कसा बदलून बोलावा याचे आकलन होईल. हळूहळू आपण एखाद्या शब्दाला अडखळतो तो शब्द बदलून सोपा शब्द वापरायची जाणीव तिला होईल आणि हा दोष किंचित राहिल.
याउप्पर असेही वाटते की पालक म्हणून तुम्ही मुलांना न्यूनगंडाची जाणीव करून दिली नाहीत तर अर्धे उपचार तेथेच होतील. तिच्यात दोष आहे याची प्रत्यक्ष जाणीव करून देऊ नका. (उदा. "मोठ्याने वाच ना म्हणजे तू कुठे अडखळतेस ते कळेल" असे म्हणण्यापेक्षा "मोठ्याने वाच ना मलाही गोष्ट ऐकायची आहे." असे सांगता येईल.) तिच्यासमोर दोषाची वाच्यता इतरांसमोर करू नका. (हे बहुधा तुम्हाला माहित असावेच तरी लिहावेसे वाटले.) सतत प्रोत्साहन देणे, वडुलेकरांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या कलाप्रकारात, खेळात, नृत्यात पारंगत करणे, तिला आवश्यक तो कॉंफिडन्स देईल.
घाईघाईत लिहिल्याने मराठी शब्द विसरल्यासारखे झाले. क्षमस्व!