दशपद्म असा शब्द नाही.
भास्कराचार्यांच्या लीलावतीत सांगितल्याप्रमाणे दहाचे घात असे: एकम्, दशम्, शतम्, सहस्रम्, दशसहस्रम् (अयुतम्), लक्षम्, दशलक्षम्(प्रयुतम्), कोटि:, दशकोटि:(अर्बुदम्, अर्बुदः), अब्जम्, खर्वम्(खर्व:), निखर्वम्, महापद्म:, शंकु:, जलधि:, अंत्यम्, मध्यम्, परार्धम्, दशपरार्धम् . दशपरार्ध म्हणजे एकावर अठरा शून्ये.
मिलियन म्हणजे एकावर सहा शून्ये. ब्रिटिश बिलियन-एकावर बारा तर अमेरिकन बिलियन म्हणजे एकावर नऊ शून्ये. ब्रिटिश ट्रिलियन म्हणजे दशपरार्ध(अठरा शून्ये) तर अमेरिकन ट्रिलियन म्हणजे ब्रिटिश बिलियन(बारा शून्ये).
हल्ली ब्रिटिश बिलियन आणि ब्रिटिश ट्रिलियन इंग्लंड सोडून इतरत्र फारसा वापरत नाहीत.