पुढे चालू...
नसेल तर या आठवडयात कुठे जावू नका.भुजबळ 'बाय पास' करून घेत आहेत.त्यांचे कामाकडे तुम्ही लक्ष द्या .'' हे बोलत असतानाच कमीशनरसाहेबांची नजर ,मनोहरने दिलेल्या फाईलीतील कागदावरऊन झरझर फिरत होती.त्यांच्या चेहऱ्यावर कौतूकाची छटा चढत होती. मग ते म्हणाले,''छान. मी ही फाइल वाचायला घरीच घेवून जाईन.'' मनोहरचा कार्यक्रम ठरलेला नव्हता.भुजबळांसारख्या सेवाजेष्ट माणसाकडील काम बघायला मिळते,याचा आनंद त्याना झाल्यावाचून राहिला नाही.
भुजबळसाहेबांकडे पुणे शहराचाच पदभार होता.त्यामुळे पुण्यातील सार्वजणिक जीवनाशी संबंधित सभा,मोर्चे,मिरवणूका इ.बाबीना परवानग्या देणे,पोलिस बंदोबस्त देणे हे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते.एसीपी मनोहरने भुजबळांचे काम पहायला सुरूवात केली आणि पहिल्याच दिवशी 'शिवशाही' पक्षाचा सभेला परवानगी मागणारा अर्ज त्यांच्या टेबलावर आला. त्याच्या सोबत परवानगी देणारे चक्रमुद्रांकीत पत्राच्या प्रती सहीसाठी ठेवलेले होते. मनोहरने प्रथम अर्ज वाचला.मग सभेसाठी परवानगी देणारे चक्रमुद्रांकित पत्र वाचले. सभेच्या तारखेच्या दिवशी संकष्ट चतूर्थी असल्याचे त्यांच्या समोर दिसणारे कॅलेंडर दाखवत होते.त्यांच्या डोळ्यासमोर सारे चित्र स्पष्ट उभे राहिले. सभेचे ठिकाण 'सारसबागेसमोर' असे होते. स्वारगेट,टिळक रोड, मित्रमंडळ ते अभिनव चौक आणि दांडेकर पूल चौक हे सारे रस्ते बंद केलेत.त्यामुळे लोकांची अक्षरश: नाकेबंदी झाली आहे. सर्वत्र ट्रफिक जाम होवुन गेले आहे.त्यानी संबंधित लिपिकाला बोलावले व त्याला पत्राचा मजकुर सांगू लागले̮. लिपिक भराभर मजकूर लिहून घेत होता.पत्राचा मजकूर लिहून झाला अन् लिपिक थक्क होऊन त्यांच्याकडे क्षणभर पहातच राहिला.त्याने आज पर्यंत असा एसीपी बघीतला नव्हता....कारण पत्र असे होते :-सभेची वेळ,जागा व तारीख पहाता,सभेला परवानगी नाकारण्यात येत आहे.कारण प्रस्तावित सभेमुळे जनजीवन विस्कळित होईल .तसेच अपूरी पोलिस संख्या विचारात घेता ,सभेच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवणे ही शक्य होणार नाही.व्यापक जनहित लक्षात घेवून प्रस्तावित सार्वजनीक सभेबाबत आग्रही भूमिका घेवू नये. सहकार्य करावे.
सही
पुणे शहर पोलिस कमीशनर,पुणे.
आयुक्तसाहेबानी ह्या पत्रावर सही केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान झळकू लागले.
----------------* --------------------------------------------*--------------------------------------------*---------------------------