लेख/कथा चांगली आहे पण मलाही अपूर्ण वाटत आहे. ह्याचे पुढे आणखी काही लेखांक आहेत काय? (अंगारा, प्रसाद हीही लाच असे म्हणायचे आहे का? तसे असेल तर मात्र गोष्टीला एक वेगळा अर्थ येईल.)
.................
आपल्याला आणि एकूणच सर्वांना उपयोगी पडतील अशा काही टीपा द्याव्यात असे वाटत आहे. कारण अशा प्रकारे लिहिणारे बरेच लोक मी पाहिले आहेत. त्यासाठी लेखातील काही ओळी उद्धृत करीत आहे.
हे सर्व चालू असतानाच ,या गर्दीचा भाग असलेले,पण स्वत:ला वेगळे समजणारे पोलिस अधिक्षक सुभानराव ,त्यांच्या नव्या एसीपी मनोहर यांची छबी कशी ओळखावी,अशा पेचात पडले होते.कारण रिझर्व्हड डब्यातून बाहेर ..
शब्दानंतर एक रिकामी जागा व नंतर स्वल्पविराम असे लेखात बऱ्याच ठिकाणी झाले आहे. तसेच स्वल्प/पूर्णविरामानंतर रिकामी जागा नाही. हे दिसायला तर वाईट दिसतेच पण असे केल्याने फॉर्मॅटिंग करताना वाक्य चुकीच्या जागी तोडले जाते. कधीकधी नवीन ओळीची सुरुवात विरामचिन्हाने होते आणि ते फार वाईट दिसते. एक अंगुष्ठनियम लक्षात ठेवावा. शब्दानंतर लगेच विरामचिन्ह द्यावे व त्यानंतर एक रिकामी जागा सोडावी.
घाईघाईत टंकित करताना कधीकधी अशा गोष्टी घडतात पण इथे बऱ्याच ठिकाणी झालेले दिसले म्हणून हे लिहिले आहे. राग नसावा.