शाळेत असताना तबला शिकायला जायचो. सर म्हणायचे हात चांगला बसतोय. रियाज करत राहा. मधे दहावी आली. दहावीला चांगले मार्क हवेतच. मग बारावी, आय. आय. टी., आय. आय. एम. आणि शेवटी अमेरिका, ह्या सगळ्यासाठी दहावी महत्त्वाची. तबला काय कधीही शिकता येईल. आय. आय. टी., आय. आय. एम. आणि अमेरिका ढगातच राहिले आणि तबला तेवढा हातचा गेला. काय कमावण्यासाठी काय विकलं? कसला बाजार?