आहे - माझ्या मते. एसीपीला आणण्यासाठी अधीक्षक! गडबड. एसीपी म्हणजे जर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असेल अधीक्षक हा त्याच्यापेक्षा वरिष्ठ ठरतो. आपल्या हाताखालच्या माणसाला आणण्यासाठी अधीक्षक जाणार नाही. शक्यच नाही.
कोणताही कमिशनर, त्यातही पुण्याचा, थेट एसीपीशी त्याच कारणास्तव बोलणार नाही. इथं देण्यात आलेल्या सहली वगैरेच्या सूचना हे दोघे नात्यातील असतील तरच शक्य आहेत. पुण्याचा पोलीस कमिशनर हा किमान अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा असतो. एसीपी ही, तो आयपीएस आहे असे गृहित धरले तरी, अगदी पहिली पायरी आहे.
तुमचा काही विशेष कार्यक्रम... यापुढील मजकूर गायब आहे. निश्चितच. त्यामुळं लेखन कळत नाही. अर्धवट वाटते. किंवा मग सुपूर्त करताना प्रकाशनयोग्य काढून टाकण्यात आले नसणार आणि ते सुपूर्त झाले असणार.