आणखी...  स्वल्पविरामानंतर एक जागा सोडावी हे योग्यच आहे, पण अर्धविरामानंतर आणि अपूर्णविरामानंतर दोन आणि  प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह यांच्या अगोदर एक आणि नंतर दोन किंवा तीन, तसेच  पूर्णविरामानंतर दोन किंवा तीन जागा सोडल्याखेरीज लिखाण चांगले दिसत नाही.  अपसारणचिन्हाच्या पुढेमागे एकएक जागा सोडावी परंतु विग्रहचिन्हाच्या पुढेमागे अजिबात  सोडू नये.  एकाच शब्दात आलेल्या अवग्रहचिन्हाच्या मागे जागा सोडू नये पण कवितेत आल्यास उच्चाराच्या लांबीनुसार एकदोन जागा सोडता येतात.  शब्द संपत असेल तर,  किंवा अन्य कारण असल्यास चिन्हानंतर अधिक जागा सोडता येतात.  कवितेतील दंडाअगोदर एक, नंतर दोन आणि दोन लागोपाठच्या दंडांमध्ये एक जागा सोडावी.