कथा/ प्रकटन उत्तम आहे, हे सांगणे न लगे. तुमचे लेखन केवळ उत्तम नसते शुद्धही असते. जसा अवतरणचिन्हांचा वापर.
त्यामुळे ज्यांना शुद्धलेखन आवडते त्यांचा वाचनाचा आनंद द्विगुणित होतो.


अवांतर:
"तू प्रश्न  फारच विचारतोस बाकी" वीणा झंकारली.
हे शुद्ध की
"तू प्रश्न  फारच विचारतोस बाकी," वीणा झंकारली.
हे शुद्ध, यावर विचार करतो आहे. हा कदाचित अमेरिकन आणि ब्रिटिश पद्धतीतला फरक असावा.