तुम्ही म्हणता ते एका अंगाने बरोबर आहे.
तरीही पुढे लिहिलेय त्यात कितपत खरे आहे? ह्यावरून पूर्ण विचार करता येईल.
_________________________________________________________
स्त्रोतः म. टा.
प्रभू रामचंदांच्या चारित्र्याबाबत विचित्र विधाने केल्याबद्दल भोपाळला अडवाणींनी करुणानिधींना धारेवर धरले; तर आक्रमक आवेशात राजनाथसिंगांनी दमुकच्या मंत्र्यांना केंदातून हाकला, अशी मागणी केली. सेतुसमुदम प्रकल्पाबाबत करुणानिधींचा आग्रह नवा नाही. भाजपला त्याची कल्पनाच नाही, असेही नाही. वाजपेयींचे सरकार सत्तेवर असताना याच दमुकचे सारे लाड भाजपने पुरवले होते. एनडीएतले ज्येष्ठ मंत्री अरुण जेटली, वेदप्रकाश गोयल, शत्रुघ्न सिन्हा व तिरूवनक्कारसु अशा चौघांनी सेतुसमुदम प्रकल्पाचे समर्थन करीत, ऑक्टोबर २००२मध्ये त्याला मंजुरी दिली. युपीए सरकारने त्यात कोणताही बदल केलेला नाही. प्रकल्पासाठी सुरुवातीला एकूण सहा मार्ग सुचवण्यात आले. राष्ट्रीय पर्यावरण इंजिनीअरिंग संशोधन संस्थेने यापैकी सहाव्या मार्गाला हिरवा कंदिल दाखवला. त्याला अनुसरूनच वाजपेयी सरकारने प्रकल्पाला मंजुरी दिली. सध्या मात्र भाजपने त्याच सहाव्या मार्गाला विरोध चालवला आहे; ज्याला पाच वर्षांपूवीर् त्यानेच मंजुरी दिली. वादग्रस्त नसलेल्या प्रतिज्ञापत्रातदेखील हाच उल्लेख होता. युपीए सरकारने मात्र हे प्रतिज्ञापत्रदेखील मागे घेतले.
_________________________________________________________
काही वेळा मला वाटते की, आपण विरोधी पक्षात आहोत म्हणून विरोध करणे आपले कर्तव्य आहे, असेच सर्वजण (पक्ष)समजतात.
वरील मुद्द्यावरुन(जर खरे असेल) आता पुन्हा असेच वाटत आहे.