काही लोकांचा इथे असा समज झालेला दिसतो की रामसेतूचे समर्थक कोणत्याही सुधारणांच्या विरुद्ध आहेत. त्यांनी कृपया मूळ विषयातील मुद्दे क्रमांक ६ - ९ पहावेत. सेतुसमुद्रम् प्रकल्पास विरोध करण्याची अनेक बिगर ऐतिहासिक आणि बिगर भावनिक कारणेही आहेत.

एका वाक्यात सांगायचे झाले, (माझ्यापुरते, पुढील विधान हे सर्व सेतुसमर्थकांतर्फे नाही) तर विरोध हा प्रकल्पास नसून त्याच्या प्रस्तावित मार्गास आहे. आणि हा विरोध श्रद्धेच्या पातळीवरून निश्चितच आहे. पण त्याच बरोबर त्यास वैज्ञानिक, आर्थिक, सामरिक कारणेही आहेत.

अजून एक. मनोगत हे व्यासपीठ सक्रीय राजकारणापासून दूर आहे (असे मी तरी मानतो). त्यामुळे या प्रश्नावर काँग्रेस - भाजप असे तट न पाडता राष्ट्रहिताची भूमिका काय याचा विचार व्हावा असे वाटते. येथे कुठल्याही पक्षाच्या समर्थनाचा अथवा निंदेचा (माझा तरी) प्रयत्न नाही. इतरांनीही कृपया यास राजकीय रंग देऊ नयेत ही प्रार्थना.