परीक्षेसाठी दगडुशेठ मंदीराजवळ "काळे पेन्स" या दुकानातले शाइचे पेन अनेकदा घेतल्याचे आठवते, पण मार्क तेवढेच पडायचे.  

शाइच्या पेनाने अक्षर सुंदर येते पण गळके पेन शर्टाच्या खिशाला डाग पाडायचे . न गळणारे फ़ाउंटन पेन मिळते का ? 

तसेच पुर्वी टीव्ही वर साप्ताहिकी मधे रविवारी संध्याकाळी कुठला हिंदी सिनेमा दाखवणार याची उत्सुकता ताणली जायची. आता दिवसाला ५-६ सिनेमे केबलवर चालु असतात. रात्री ८.२० ला छायागीत साठी टीव्हीसमोर उड्या पडायच्या.