सर्वप्रथम श्री. भावेश शहा यांचे आभार. (हे नाव देखील श्री. अ. कुलकर्णी इतकेच कॉमन आहे. )
तसेच संशोधक मनोगतींना आवाहन की एकदम सोपी अलार्म पद्धत शोधावी की एक भाग आपल्या पर्समधे व दुसरा खिशात ठेवता येईल व दोन्हीमधे ५ फ़ूटापेक्षा जास्त अंतर पडले की पर्समधील अलार्म वाजू लागेल. आकारने असा लहान की मनगटी घड्याळाला किंवा बांगडीला, कि-चेनला पण तो लावता येइल की जेष्ठ महीलांना परत खिसा नाही त्यामूळे ते पण पर्समधेच राहीले ही सबब देता येणार नाही.