संजोप,
खूप दिवसांनी आलात, पण आलात ते असे ओल्या आठवणी जागवत. नेमक्या शब्दांत ह्या चित्रपटाचा परामर्ष घेतलेला आवडला.
असरानी एफ. टी. आय. आय. चा एक गुणी विद्यार्थी होता, व त्याच्या अभिनयाच्या क्षमतेचा हृषिदांसारख्या रत्नपारख्याने उपयोग करून न घेतला तरच नवल.
'दो नैनों मे' हे खास लताबाईंचा टच् असलेले एक नितांतसुंदर गाणे! 'निंदिया' ह्या शब्दाला तसेच हलकेच सोडून देणे ही करामत त्याच करू जाणे. 'निंदिया' व 'कैसे' ह्या दोन शब्दांमध्ये अंतर खूप आहे, व तानबाजी करण्याचा मोह होणे अशक्य नाही. पण असे संयत, अंडरप्लेड गाणे हे बाईंचे एक वैशिष्ट्य.