तांदुळ व बेसनाचे प्रमाण किती हवे? मी इथे नागपुरला आल्यावर माझ्या एका मैत्रिणीकडून हा भात शिकले. हरभरा डाळीचा भरडा १ वाटी व तांदुळ २ वाट्या असं प्रमाण घेते. भरड्यात हळद, तिखट, मीठ, धन्या-जीऱ्याची पूड, हिंग व थोडे तेल असे एकत्र अर्धा तास भिजवून ठेवायचे तसेच तांदुळही धुवून अर्धा तास भिजवून ठेवावे. एका पातेल्यात तेलाची हिंग, हळद घालून त्यावर तांदुळ परतवून घ्यावे. दुप्पट पाणी टाकावे व उकळी आली की त्यात भरड्याचे गोळे भात शिजवून घ्यावा. खातांना वरून लाल मिरच्या, लसणाची फोडणी घेऊन खावे.