खुशबू पाहिला तेंव्हा मी लहान होते. तरीही त्याचा खोलवर ठसा मनावर उमटला आहे. हेमा मालिनीचं काम पाहून मी भारावूनच गेले होते. जितेंद्रनेही चक्क अभिनय केलाय या मताशी अगदी पूर्णपणे सहमत आहे.
फरीदा जलाल ही तर माझी विशेष आवडती अभिनेत्री आहे.वर मीराताईंनी उल्लेख केलेल्या दोन्ही मालिकांचीच आठवण मलाही झाली.
बाकी 'ओ माझी रे' आणि 'बेचारा' बद्दल काहीही लिहिणं शक्य नाही. त्या गाण्यांचा श्रवणानंद आणि त्यातून येणारी अनुभूती फक्त अनुभवावी.
परीक्षण आवडले. अगदी आठवणींच्या मोहोळाला दगड मारणारे वगरे वाटले 
--अदिती