विचारप्रदर्शनासाठी अधिकाधिक सुसंस्कृत आणि परिपक्व भाषा वापरणे निश्चितच जरूरीचे आहे. आंग्ल भाषेतही ऑफिशिअल आणि पार्लमेंटेरिअन असे शब्द रूढ झाले कारण कोणत्याही व्यासपीठावरील भाषा ही बोलीभाषेपेक्षा अधिक परिपक्व आणि नियंत्रित असावी असे मत पुढे आले. त्यामुळे वाङ्मयासाठी बोलीभाषा ही जास्त जवळची असली तरी वैचारिक देवाणघेवाण ही प्रमाणित भाषेत होणे अगत्याचे आहे. याबाबतीत आम्ही श्री. महेश यांच्या विचारांशी सहमत आहोत.
आपला,
(शब्दप्रेमी) धोंडो भिकाजी जोशी.