अरे.. चक्रपाणी..
अगदी तू तर माझ्या मनातलं मधुबालाचं स्पष्टीकरण केलंस... "अप्सरा" हे एकच विशेषण तिला शोभतं... मी ही मधुबालाला पहिली ती नेहमी माझ्या एका मैत्रिणीच्य रूपात.. नेहमीच ती मला माझ्या मनाच्या अगदी जवळ वाटली.
"हाफ़ टिकट" मधली तिची व्यक्तिरेखा सालस आणि किशोर कुमारच्या अवखळपणाला शोभणारी होती. खास करून "आखों में तुम दिल में तुम हो.. तुम्हारी मर्जी" हे गाणं म्हणजे मधुबालाच्या सौंदर्याची आणि अभिनयाची पावतीच आहे.
माझ्या मनांत मीनाकुमारीचा बोजडपणा ( मीना कुमारीच्या चाहत्यांची माफी मागून) आणि मधुबालाचं करारी नि सात्त्विक सौंदर्य यामध्ये तुलना झाली...
जितक्या वेळेला मी पुन्हा पुन्हा मधुबालाचे चित्रपट पाहिले तितक्या वेळेला मला तिच्या सौदर्यातला वेगळा पहलू सापडत गेला.. तू म्हणतोस ते अगदी खरं आहे...
...झाल्या बहु, होतीलही बहु, 'परी' हिच्यासम हीच...
- प्राजु