मधुबालाची प्रचंड चाहती असलेल्या मला हा लेख म्हणजे एक मेजवानीच आहे. सुरेख लिहिलाय. अभिनंदन.
मधुबाला, नव्हे मूर्तिमंत सौंदर्यच! ती कुठल्या चित्रपटात किंवा गाण्यात अधिक सुंदर दिसल्ये याची क्रमवारी लावणे निव्वळ अशक्य आहे. मग ते 'मोहे पनघट पे' असो, 'जानू जानू रे काहे खनके है तोरा कंगना' मधली मैत्रिणीबरोबरची थट्टामस्करी असो नाहीतर ' अच्छाजी मै हारी चलो मान जाओ ना' म्हणत केलेली मनधरणी असो....तिची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. (माधुरीशी तिची तुलना का करतात मला अजूनही कळलेले नाही. मधुबालाच्या नखाचीही सर माधुरीस नाही. दोघी पूर्णपणे वेगेळ्या आहेत. इति माझं मत.)
शशिकांत किणीकर यांनी 'मधुबाला' या मराठी पुस्तकात तिच्या कारकिर्दीचा सुरेख आढावा घेतला आहे. मधुबालाच्या चाहत्यांनी अवश्य वाचावे असेच ते पुस्तक आहे.
खरोखर, ...'परी' हिच्यासम हिच हे मधुबालाच्या बाबतीत अतिशय सत्य आहे.
-वर्षा