थोडक्यात सांगायचे तर..जिवेत् शरदः शतम् !
या राजकारणी लोकांनि दाखवुन दिले कि ते आहेत म्हणुन सर्व काही होत आहे! परवाच संपलेल्या गणेशोत्सवात सर्वत्र मोठे मोठे बॅनर्स झळकत होते त्यात सुद्धा श्रीं चे छायाचित्र असेल त्याहुन मोठी छबी आपली हवी अश्या चढाओढीने सर्व राजकारणी नेते आणि त्यांच्या त्यांच्या टोळीतले 'कार्यकर्ते' चमकत होते! अहो, जिथे प्रत्यक्ष श्रीं ची किंमत ठेवली जात नाही तिथे या क्रिकेटपटुंचे काय?
क्रिकेटची स्पर्धा म्हणजे काही कारगिलचे युद्ध नव्हे! अहो, तुम्हाला माहित आहे का, कारगिल चे युद्ध सुद्धा हेच लोक राज्यावर होते म्हणुन जिंकले आपण! यांचे मार्गदर्शन नसेल तर अश्या गोष्टी होणे शक्यच नाही! आणि हे लोक खरंच प्रसिद्धीपासुन नेहमी वंचीत राहिले आहेत, म्हणुन तर आपल्याला कारगिल युद्धानंतर काढलेल्या विजय यात्रेबाबत आणि त्या जवानांवर केलेल्या खैराती बद्दल कधी काहिच कळले नाही!! त्या वेळी प्रसार माध्यमांनि सुद्धा किति सदसद्विवेक दाखवुन सवंग प्रसिद्धी देण्याचे टाळले माहिते आहे?
तर आता आपणच पुढाकार घेउन पवार साहेबांचा एक शानदार सत्कार केला पाहिजे. जिवेत् शरदः शतम् !