"अरे हनुमाना, आजकालच्या या अभियंत्यांना काय झाले आहे? एका नाल्यावरचा  साधा पूल बांधण्यासाठी आधी पाया खणा, त्यावर खांब उभे करा, त्यावर तुळया टाका, त्यावर सिमेंटचा थर पसरवा, ख़डी व डांबर पसरून त्यावर रूळ फिरवा. त्यांचे डोके फिरले आहे की काय? कशाला एवढा खटाटोप? एवढे सगळे करून त्यांनी बांधलेले पूल धडाधड कोसळत आहेत. ते कांही नाही. तू आताच्या आता पृथ्वीतलावर जाऊन हे सारे तकलादू पूल उध्वस्त करून टाक. साथीला जांबुवंताला नेऊन त्याच्या अधिपत्याखाली आपल्या वानरसेनेकडून ते पुन्हा एकदा बांधवून घे. वाटल्यास खारोटीमावशांनासुद्धा मदतीला घे."