पहिली गोष्ट --परार्ध म्हणजे एकावर सतरा शून्ये, सोळा नाही.  हा तांत्रिक शब्द आहे, याची व्युत्पत्ती बघायची नाही. ज्याप्रमाणे लक्ष म्हणजे लक्ष्य, निशाण; चिन्ह; कपट; आणि लाख, 

कोटी म्हणजे टोक;   शिखर;  आधिक्य(तुला-पराकोटी); त्रिकोणाचा लंब;  काटकोनाची उभी रेषा;  पक्ष, मत;  कल्पना;  जात(तुला-मनुष्यकोटी) आणि शंभर लाख, 

अब्ज म्हणजे जलोत्पन्न;  कापूर;  धन्वंतरी;  वाळा आणि शंभर कोटी, 

तसेच परार्ध. त्याचा आणखी एक (मूळ) अर्थ-उत्तरार्ध,  दूरचा अर्धा भाग.