यांना समाजाने व समाजधुरीणांनी काय दिले? त्यांची काय कदर केली? त्यांच्या पायावर मस्तक ठेवायला त्यांनी पुजलेला क्रांतिमार्ग का आड आला? त्यांच्या त्यागापेक्षा नेत्यांची तत्त्वे महत्त्वाची? मान सोडाच पण समाजाला अशा लाखो त्यागीनींची नावे देखिल ज्ञात नाहीत. त्या उपेक्षितच राहिल्या. देशाला एक ना एक दिवस स्वातंत्र्य मिळणारच होते, पण या त्यागिनींना कधीही काहीही मिळणार नव्हते, उराशी खंत घेउन त्यांना एकाकी प्रवास करायचा होता.

हीच तर खरी शोकांतिका आहे. तत्त्वे जर लवचिक नसतील, तर ती तत्त्वे न राहता दुराग्रह/हट्ट होतात, हे न कळण्याइतका स्वातंत्र्यपूर्व काळातील कोणताही अहिंसावादी नेता मूढ नसावा; आणि अशा अनेक अज्ञात माताभगिनींच्या ऋणांचे मोल न कळण्याइतका स्वातंत्र्योत्तर काळातला 'राजकारणी'ही (स्वातंत्र्योत्तर काळातील नेत्यांना आपण चुकीने नेता म्हणतो, असे मला बरेचदा वाटते. त्यांना 'राजकारणी' हाच एकमेव योग्य शब्द आहे)! त्यामुळे अशा अज्ञात आयाबहिणींच्या आयुष्याची परवड होण्यासाठी बव्हंशी हे धुरंधरच उत्तरदायी नाहीत का?

प्रदीप म्हणतात तसे मन सुन्न होते.