लोकहो,
’साप्तहिक सकाळ’ तर्फे दरवर्षी कथास्पर्धा घेतली जाते. यावर्षी त्या कथास्पर्धेत माझी ’मी आणि नवा पाऊस’ ही कथा सर्वोत्कृष्ट पाच कथांमधे निवडली गेली आहे. या पाचांमधे पहिला-दुसरा इत्यादी क्रमांक त्यांनी लावलेले नाहीत.
आज प्रसिद्ध झालेल्या या आठवड्याच्या साप्ताहीक सकाळ च्या कथा विशेषांकामधे ही कथा छापून आली आहे.
माजी संमेलनाध्यक्ष प्रा रा ग जाधव हे परिक्षक होते. त्यांनी कथास्पर्धेबद्दल लिहिलेल्या टिप्पणीमधे माझ्या कथेचा विशेष उल्लेख केलाय.
या आठवड्याचा साप्ताहिक सकाळ जरूर वाचा आणि मला कथेवर अभिप्राय द्या.
धन्यवाद,
नीरजा पटवर्धन