यात नेमके विनोदी काय आहे ते कळले नाही? भारतातील ट्रॅफिक हे एखाद्याला किती फ्रस्ट्रेशन आणू शकते त्याचा उत्तम नमुना आहे. चांगल्या धडधाकट माणसांना रस्ते ओलांडणे मुश्किल आहे तेथे म्हाताऱ्यांना किती कठिण असावे? त्यात सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर अतिक्रमण केल्याची चूक करायची आणि त्यावर कावलेल्या माणसाला हसायचे हा विनोद असतो का?